१. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपल्या कॉम्प्युटरला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने संपूर्ण स्कॅन करुन घ्यावे.
२. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपण जो अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरता तो त्या कंपनीच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन अथवा अपडेशनचा पॅच डाऊनलोड करुन अद्ययावत करावा.
३. दुसर्यांच्या कॉम्प्युटरमधिल कुठलीही फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी करण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.
४. ईमेलद्वारे आलेल्या कुठल्याही फाईलीली डाऊनलोड करुन उघडून पहाण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.
५. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ऑटो अनेबल मोडवर ठेवावे म्हणजेच ते आपणहून व्हायरस शोधण्याचे काम दरवेळी करीत राहील म्हणजेच कुठलाही व्हायरस सापडल्यास अथवा आढळल्यास त्वरीत त्याची सुचना तो देतो
No comments:
Post a Comment