Tuesday, June 22, 2010

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काम कसे करते ?

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल सर्व फाईल्समधिल प्रोग्राम चाळून त्यामध्ये इतर फाईलींना खराब करणारा अथवा आपणहून इतर फाईलींमध्ये शिरणारा प्रोग्राम असल्याची सुचना असलेल्या फाईली शोधण्याचे काम करते. एखाद्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शोधण्याच्या प्रकारामध्ये दोन विभाग पडतात. १) तंतोतंत नावाने शोध २) व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध. या दोन प्रकारातील व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध हा प्रकार जास्त प्रभावशाली असतो कारण मुळात एखाद्या फाईलचे नाव आणि स्वरुप काहीही असो त्यातील प्रोग्राममधिल कृती व्हायरसप्रमाणे आहे का या गोष्टीचा शोध या प्रकारामध्ये घेतला जातो.

एखादे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्यात कितीही कार्यक्षम आणि प्रभावी असले तरी व्हायरस बनविणारे देखिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा अभ्यास करत असतात आणि कुठल्याही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येणार नाही नविन वेगळा आणि उपद्रवी व्हायरस बनवितात. अशावेळी नविन व्हायरस जुन्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येत नाही व तो व्हायरस खुशाल त्या कॉम्प्युटरमध्ये आपले काम करत राहतो.

ज्याप्रमाणे कुठल्याही औषधाची एक अंतिम मुदत (Expire Date) असते त्याच प्रमाणे कुठलेही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काही महिन्यानी थोडेफार कमकुवत बनते म्हणजेच नविन आलेल्या व्हायरसला ते शोधू शकत नाही. म्हणूनच या जुन्या झालेल्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर्सना वेळोवेळी अद्ययावत (Upgrade/Update) करणे आवश्यक असते. सध्या सर्वच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर बनविणार्‍या कंपन्या त्यांच्या सॉफ्टवेअरसाठी वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर नविन व्हायरस शोधण्यासाठीचे व त्यांचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे प्रोग्राम मोफत देतात.

1 comment:

  1. KotaBet Casino: Home - Kambangpintar.com
    KotaBet is 바카라 사이트 a kadangpintar Kambangpintar based online casino, offering a range of casino 인카지노 games and casino games. It is owned by Kambang

    ReplyDelete