आपल्या रोजच्या वापरामध्ये कधी कधी संगणक वापरताना छोटी छोटी अडचण येते व आपण काही करु शकत नाही ह्या भावनेने सरळ रिपेयर करणा-या व्यक्तीला फोन करतो,जरा थांबा, शक्यतो अडचण मोठी नसावी, शक्यतो ती अडचण तुम्ही स्वत:च दुर करु शकाल ह्यामुळे तुमचा वेळ ही वाचेल व पैसा ही. विविध लेखमालेतून आपण सामान्य अडचणी व त्यावर उपाय ह्या वर माहिती घेऊ, मी काय मास्टर नाही आहे, काही अडचणी साठी तुमच्याकडे वेगळा उपाय असू शकतो तेव्हा निसंकोच पणे येथे लिहा.
१. सिडी-रोम / डिव्हीडी रोम चा डिस्क ट्रे बाहेर येतो पण आत जात नाही व सिडी चालवण्यासाठी चार-पाच वेळा प्रयत्न करावा लागतो ?तुमचा सिडी रोम सिडी व्यवस्थीत रिड करु शकत नाही आहे त्यामुळे तो डिस्क बाहेर पाठवतो आहे, ह्याचे सर्वात कॊमन कारण हे आहे की तुमचा रोमच्या लेन्सवर धुळ बसली आहे व त्यामुळे तो व्यवस्थीत काम करत नाही आहे, मार्केट मध्ये २०-२५ रुपये मध्ये सिडी लेन्स क्लिनर
मिळतो तो वापरा. व ह्याच्या आधी रोम बरोबर आत जोडलेल्या केबल्स (पावर केबल व डेटा केबल) चे कनेक्टर चेक करा, जर ते लुज अथवा व्यवस्थीत बसले नसतील तरी वरील अडचण येऊ शकते.
ही अडचण का येते ? नियमीत पणे सिडी रोमचा वापर न झाल्यामुळे / नियमीत पणे लेन्स क्लिनर न वापरल्यामुळे.
२. मला अटोमेटिक विडोंज अपडेट थांबवायचे आहे काय करु ?ह्या साठी सर्वात प्रथम Start वर क्लिक करा व RUN च्या खिडकीमध्ये टाईप करा net stop wuauserv व काही सेकंद वाट पहा, एक CMD खिडकी समोर उघडेल व एक संदेश देऊन बंद होईल, झाले तुमचे काम :)
३. माझा संगणकावर नेहमी पाच एक मिनिटाने आपोआप जाहिरातीच्या छोट्यामोठ्या खिडक्या उघडत आहेत काय करु ?हा स्पायवेयर आहे ! तुम्ही जे डाऊनलोड करु नये / ज्या वेबसाईट वरुन डाऊनलोड करु नये तेथून काहीतरी चुकुन डाऊनलोड केले आहे व त्या चुकी बद्दल तुम्हाला फोर्स केलेल्या जाहिराती तुमच्या इच्छे विरुध्द पाहावी लागत आहे, काळजी नको उपाय आहे. पहिला उपाय सिस्टम रिस्टोर करा, ह्यामध्ये तुम्ही तयार केलेल्या फाईल्स व माहिती जशीच्या तशीच मिळेल व तुमची अडचण दुर होईल, Start नंतर Programs > Accessories > System Tools व येथे तुम्हाला System restore प्रणाली भेटेल ह्याला क्लिक करुन तुम्ही जेव्हा पासून जाहिराती येत आहेत त्याच्या एक-दोन दिवस आधीचा सिस्टम रिस्टोर पॊईन्ट रन करा. १५-२० मिनिटे लागतात एका सामान्य सिस्टम साठी पण अडचण दुर झालेली असेल.
दुसरा उपाय - समजा वरील उपाय तुमच्या उपयोगी आला नाही तर ? सिस्टम रिस्टार्ट करा व बुट स्क्रिन येण्याच्या आधी एक चार पाच वेळा F8 दाबा, येथे तुम्हाला विन्डोज बुटिंग ऒप्शन भेटतील त्यातील सेफ मोड व इंटर करा. काही वेळाने संगणक सेफ मोड मध्ये चालू होईल, संगणकात प्रवेश करण्याआधी तुम्हाला एक रिस्टोर चा ऒप्शन येईल त्याला रद्द करा. व एडमीन अकाऊंटने संगणकात प्रवेश करा (जर एका पेक्षा जास्त युजर संगणक वेगवेगळ्या अकाऊंटने संगणक वापरत असतील तर) व कंन्ट्रोल पॆनल मध्ये जाऊन Add or Remove Programs मध्ये जाऊन तुम्ही मी देत असलेल्या नावाप्रमाणे अथवा नावासारखे जी प्रणाली दिसत असेल त्याला अनईन्स्टॊल करा. उदा. नावे. P2PNET, P2PNETWORK, FILEGRABBER, ALTPAYMENTS, FSUPPORT,ITBILLS, LICENSE MANAGER, MEDIAPIPE, DOWNLOADMANEGER, MOVIE PASS, MOVIELAND, MOVIETUBE, MYFREEMEDIA, MYACCESSMEDIA, MYMEDIA, MEDIAPASS, ADULTPASS, FREEADULTMOVIEPASS, FREEADULTTV, MYTV, FREETV, TV4U.
हे झाल्यावर Windows Explorer उघडा व program files मध्ये जाऊन तुम्ही जी प्रणाली अन ईन्स्टॊल केली आहे त्याच्या रिलेटेड फोल्डर डिलिट करा व स्टार्ट > रन येथे टाईप करा MSCONFIG ईटर केल्यावर एक खिडकी उघडेल त्यामध्ये Startup टॆब वर क्लिक करुन त्यातील लिस्ट मधील तुम्ही काढून टाकलेल्या प्रणाली रिलेडेड जे नाव असेल त्याच्या समोरील टिक मार्क काढा. व ओके वर क्लिक करा. व आपला सिस्टम रिस्टार्ट करा नॊर्मल मोड मध्ये ;) डन काम तमात जहिरातींचे !
ही अडचण का येते ? गरज नसलेल्या जाहिरातीवर / संकेतस्थळावर क्लिक केल्यामुळे व समोर विचारत असलेल्या इनस्टॊल विंडोला न बघताच ओके करण्याच्या सवयी मुळे ;)
४. संगणक चालू केल्या नंतर काही मिनिटामध्येच (१५-३०) बंद पडतो काय करु ?जर काही चेतावनी न देता संगणक बंद पडत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा प्रोसेसर गरजेपेक्षा जास्त गरम होत आहे व त्यावर लावलेला कुलींग फॆन काम करत नाही आहे, अथवा व्यवस्थीत कुलींग करत नाही आहे ह्या साठी तुम्हाला तुमच्या सीपीयू चे डाव्या बाजूचे पॆनेल उघडावे लागेल व पॅनेल उघडल्यावर परत एकदा संगणक चालू करा व सिपीयूच्या वरती लावलेला फॅन बघा, जर तो फिरत असेल व त्याची स्पीड व्यवस्थीत असेल तर दुसरी अडचण आहे तुम्हाला हार्डवेअर इंजिनियरला बोलवावे लागेल, पण जर व्यवस्तीत फिरत नसेल तर तर व त्यावर धुळ असेल अथवा काही कचरा फसलेला असेल तर संगणक बंद करुन मग साफ करा, शक्यतो हाताने केबल ओढण्याचा प्रयत्न करु नका ज्या आजू बाजूला आहेत, त्यांना सावकाश बाजूला करा व मग फॅन साफ करा. जर तुमच्या कडे हवा मारण्याचे अथवा हवा खेचण्याचे मशीन असेल तर अती उत्तम, सर्व संगणकातील धुळ साफ करुन घ्या. तुमचे काम झाले !
ही अडचण का येते ? प्रोसेसर चे टेंपरेचर हे ६० डिग्रीच्या पुढे गेले की संगणक बंद पडतो, कारण पुढे होणारे नुकसान टाळावे ह्या हेतूने ह्याच्या बाओस मध्ये ही सेटींग बाय डिफाल्ट असते.