Saturday, June 26, 2010

VLC प्लेअर एक परिपुर्ण प्लेअर..............


नमस्कार मंडळी ,
बरेच लोक आजही Windows media player हा गाणी वाजवण्यासाठी व PowerDVD डीवीडी प्ले करण्यासाठी वापरतात. मात्र तुम्ही कधी VLC प्लेअर वापरलाय काय?? मुक्तस्त्रोत असलेला हा प्लेअर तिन्ही ओएस (म्हणजे मॅक ,लिनक्स , विन्डोज ) साठी उपलब्ध आहे .याची विशेषता म्हणजे हा खुप प्रकारचे video FORMATS
प्ले करतो चला याची माहीती घेऊया........


VLC मीडीया प्लेअर हा खालिल गोष्टी प्ले करतो ....
(MPEG-1, MPEG-2, MPEG-4, DivX, mp3, ogg, vob,MPEG (ES,PS,TS,PVA,MP3),AVI,ASF,WMV,WMA,MP4,MOV,3GP,OGG , OGM , Annodex,Matroska (MKV),Real,WAV (incuding DTS),Raw Audio: DTS, AAC,AC3,A52,Raw DV,FLAC,FLV (Flash),MXF,Nut,Standard MIDI , SMF,Creative™ Voice ...) या बरोबरच DVDs, VCDs, आणि बरेच streaming protocols.
तसेच याची नवीन आवृत्ती Real media(.rmv .rm )सुद्दा प्ले करतो..
तसेच हा प्लेअर तुमचे TV TUNER ,WEBCAM सुद्धा चालवतो..
आणि हे सर्व मिळते आपल्याला एका compact view मधे तसेच याची साईज सुद्धा बघावे तर खुप कमी आहे
या प्लेअर मधे काही विशेष गोष्टी आहेत .यात डेक्सटॉप वर विडीओ ला वालपेपर प्रमाणे लावता येते.
तसेच याचे EQUAILIZER खुप शक्तीशाली आहे यात खुप प्रकार आहेत जसे PARTY,ROCK,POP,FULL BASS,HEADPHONE,LIVE ,HALL .

या प्लेअर च्या स्किन्स सुद्धा http://www.videolan.org/vlc/skins.html वर उपलब्ध आहेत :










तसेच यामधे हॉटकीज ची सुविधा आहे. त्या तुम्ही Preferences-->Hotkeys मधे जाउन पाहु शकता.
तुम्ही हा प्लेअर http://www.videolan.org/वरुन डाऊनलोड करु शकता.
धन्यवाद !!
आणि वापरल्यावर प्रतिक्रिया नक्की द्या...

Thursday, June 24, 2010

फाईल एक्सटेंशन वरून फाईलचा प्रकार कसा ओळ्खाल ?

मित्रहो आजकाल अनेक प्रकारचे (softwares and programs ) सॉफ्टवेर्स आणि प्रोग्राम्स बाजारात आले आहेत. आणी विन्डोज़ प्रोग्राम सर्व वाचकाना सोयीस्कर जावे म्हणुन या सर्व प्रोग्राम फाईल्सना एक ओळख देण्यात आली आहे. कोणत्याही फाईल च्या नावापुढे ___.avi, ___.mp3, __.xls असे लिहिलेले असते ना , तीच असते फाईल ची ओळख. यालाच फाईल एक्सटेंशन (extention) असेही म्हणतात . तर आज आपण या सर्व फाईल एक्सटेंशन ची ओळख करून घेणार आहोत.
फाईल एक्सटेंशन हे फाइल चा प्रकार ओळखण्यासाठी वापरले जाते. फाईल च्या नावानंतर पुढे एक टिम्ब आणी तीन अक्षरं असे मिळून फाईल एक्सटेंशन तयार होते. तुमच्या संगणकावर हमखास दिसणारी काही एक्सटेंशन आता आपण पाहुया
* _.au - हे एक्सटेंशन एका साउंड फाईल चे निर्देशक आहे. बरयाच साउंड प्लेयिंग प्रोग्राम्स वर या फाईल चालतात . साउंड प्लेयिंग प्रोग्राम्स म्हणजे अशे प्रोग्राम्स ज्यावर गाणी अथवा चित्रपट पाहता येतात.
* .avi - हे एक्सटेंशन एका विडियो फाईल चे निर्देशक आहे. माइक्रोसॉफ्ट मीडिया प्लेयर (microsoft media player) वर या फाईल्स चालतात.

* .bmp - माइक्रोसॉफ्टच्याच विन्डोज़ पेंट (Windows Paint) प्रोग्राम मध्ये तयार होणारया सर्व चित्रासाठी या एक्स टेंशन चा वापर केला जातो. यालाच बिटमैप (BITMAP) असेही म्हंटले जाते.

* .dll - हे एक्स टेंशन असणार्‍या फाईल जरी नेहमी कम्पुटर वापरताना गरजेच्या नसल्या तरी महत्वाच्या असतात. Dynamic link library असे याचे पूर्ण नाव आहे. यामध्ये कंप्यूटर च्या कामासाठी लागणार्‍या काही कॉमन common फाईल्स ठेवलेल्या असतात. कधी चुकुनही .dll एक्सटेंशन असणार्‍या फाईल डिलीट delete करू नका.

* .exe - हे एक्सटेंशन executable एक्सीक्युटेबल फाईलचे निर्देशक आहे. एक्सीक्युटेबल फाईल म्हणजे असे प्रोग्राम जे कम्पुटर वर चालवल्यावर इन्स्टॉल होतात आणी मग काम चालू करतात. या फाईल्स अतिशय सावधानतेने हाताळाव्या लागतात कारण बरेच वायरस (virus) प्रोग्राम्स .exe या प्रकारात मोडतात.

* .gif - या एक्सटेंशन चा वापर देखिल एक प्रकारची image चित्र फाईल दाखवण्यासाठी होतो. याचे पूर्ण नाव Graphic interchange format ग्राफिक इंटरचेंज फॉर्मेट असे आहे. या फाईल्स .bmp फाईल्स पेक्षा आकाराने लहान असतात आणी त्यामुळेच इंटर नेट वर वापरल्या जाणार्या बरयाच इमेज फाईल्स .gif या एक्सटेंशन च्या असतात .

* .jpg / .JPEG - हे देखिल एका चित्र (image इमेज ) फाईल चे एक्सटेंशन आहे. याचे पूर्ण नाव " Joint Photographers Experts Group.” (जौइंट फोटो ग्राफर्स एक्सपर्ट्स ग्रुप ) असे असून .jpg/ . jpeg या फाईल्स .bmp आणि .gif या दोन्ही प्रकारानपेक्षा खुप लहान असतो अणि म्हनुनच इन्टरनेट वर याचा जास्त वापर होतो.

* .mp3 - हे एक्सटेंशन तुमच्या अधिक परिचयाचे असेलच. म्युझिक फाईल्स (गाणी, आवाज) चा पुर्वीचा आकार (size)कमी करून म्युझिक च्या मूळ प्रतिमध्ये (quality) बदल न करता साठविण्यासाठी .mp3 एक्सटेंशन चा वापर केला जातो..mp3 नाव "Moving Picture Experts Group-1 Audio Layer 3" याचा शोर्टफॉर्म आहे.

* .scr - आपल्या संगणकावर असलेल्या स्क्रीन सेवर screen saver फाईल्स दर्शविण्यासाठी या एक्सटेंशन चा वापर करतात.

* .ttf - True Type Font याचा शोर्टफॉर्म असलेले हे एक्स टेंशन वापरले जाते विविध प्रकारच्या फोंट्स (fonts) फाईलसाठी . Fonts म्हणजे संगणका मध्ये वापरल्या जाणार्‍या विविध अक्षररचना.

* .txt - विन्डोज़ मधील नोटपॅड या ऍप्लिकेशन मध्ये बनलेल्या सर्व फाईल्सना .txt हे एक्सटेंशन असते. नोटपॅड हे माइक्रोसॉफ्ट वर्ड चे एक सोपे रूप आहे. मुख्यतः सॉफ्टवेर प्रोग्रामर्स या फाईल्सचा वापर करतात.

* .wav - विन्डोज़ मीडिया प्लेयर किंवा विन्डोज़ साउंड रेकोर्डर या आप्लिकेशन्स मध्ये वापरल्या जाणार्‍या म्युझिक फाईल्स साथी हे एक्सटेंशन वापरले जाते. परन्तु .mp3 पेक्षा .wav या फाईल्स अधिक जड़ असतात.

* .zip - विन्डोज़ आर्चीव विनझिप ( Windows archieve WINZIP) प्रोग्राम चे हे एक्सटेंशन आहे. बर्याच फाईल्स एकत्र पाठविण्यासाठी त्यांची साईझ कमी करून .zip फाईल्स चा वापर केला जातो.

Tuesday, June 22, 2010

कॉम्प्युटरवरील आपल्या कामाचे पुरावे कसे लपवाल !

बर्‍याच वेळा तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर इतर कुणीही व्यक्ती इतकेच की तुम्हीसुद्धा त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकता. कारण कुणीही एखाद्या कॉम्प्युटरवर केलेल्या कामाची तो कॉम्प्युटर नोंद ( Log ) ठेवतो. ती नोंद पाहून कुणीही त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकतो.

म्हणून तुम्हाला जर तुम्ही केलेल्या कामाची नोंद इतरांपासून लपवायची असेल तर त्यासाठी खाली काही पर्याय दिले आहेत. पण एक लक्ष्यात असू द्या ते म्हणजे, असे कुठलेही कुलुप नाही ज्याला किल्ली नाही त्याच प्रमाणे तुम्ही कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी एखादी (तुमच्याही पेक्षा) हुशार व्यक्ती ते शोधून काढू शकते.

१. विंडोज मध्ये पुरावे कसे मिटवाल?

:- १) तुम्हाला जर तुमची एखादी अति महत्वाची फाईल नष्ट ( डिलिट ) करायची असल्यास तीचे नाव बदलून ( तेही कॉम्प्युटरमधल्या एखाद्या फाईलीचे नाव वाटेल असे. ) उदा. ' Setup किंवा Winhelp ' असे देवून त्या फाईलीला डिलिट करा. तसेच ती फाईल रिसायकल बिन मधून देखिल डिलिट करायला विसरु नका.

:- २) तुम्ही केलेल्या किंवा उघडलेल्या फाईलीचे नाव विंडोजमधिल ' Start >> Documents ' मध्ये जमा होते. त्यासाठी ' Start >> Documents ' वर माऊस न्या बाजूला येणार्‍या यादीमध्ये आपण उघडलेल्या फाईलीचे नाव दिसेल, त्यावर माऊसने राईट क्लिक करुन ' Delete ' ह्या बटणावर क्लिक करा.

२. एखाद्या सॉफ्टवेअर मधिल पुरावे कसे मिटवाल?

:- १) एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये उदा. वर्ड, एक्सेल, फोटोशॉप अथवा ड्रिमव्हिवर मध्ये जर तुम्ही एखादी फाईल उघडलीत तर त्याच सॉफ्टवेअरमध्ये बटणांच्या वरील मेनूबारमधिल ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये शेवटी उघडलेल्या काही फाईलींची नोंद दिसेल, त्यात तुम्ही उघडलेल्या फाईलींची देखिल नोंद असेल, इथे फक्त आपल्याच फाईलींची नोंद मिटविणे शक्य नाही त्यासाठी त्या ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली दिसणार्‍या त्या सर्व फाईल्स पून्हा त्याच क्रमाने उघडाव्यात परंतू शेवटी आपली फाईल उघडण्या एवजी दुसरीच एखादी नको असलेली फाईल उघडावी, जेणे करुन आपल्या फाईलींची नोंद तेथून नाहीशी व्हावी आणि त्याएवजी त्या शेवटी उघडलेल्या फाईल येईल.

३. इंटरनेट एक्सप्लोरर मधिल पुरावे कसे मिटवाल?

आपणास माहीत आहेच की इंटरनेट एक्सप्लोरर हे एखादी वेबसाईट पाहाण्यासाठी वापरले जाते, जसे आपण आता त्याच सॉफ्टवेअरमध्ये ( ब्राऊझरमध्ये ) ही सहजच.कॉम वेबसाईट पाहत आहात. इंटरनेट एक्सप्लोररच नव्हे तर कुठल्याही ब्राऊझरमध्ये पाहिलेली कुठलीही वेबसाईट त्याचा ' History ' आणि ' Address Bar ' मध्ये साठविली जाते.

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आपण पाहिलेल्या वेबसाईट नोंद मिटविण्यासाठी खालिल क्रिया करा.

बटणांच्या वरील मेनूबार मधिल ' Tools ' या विभागातील ' Internet Options... ' या उपविभागावर क्लिक करा.


आता समोर येणार्‍या चौकोनात ' Delete Cookies... ' ह्या बटणावर क्लिक करा, त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट/फाईलींची नोंद कॉम्प्युटर ' Temporary Internet Files folder ' नावाच्या एका फोल्डर मध्ये ठेवतो त्यालाच ' Cookies ' असे म्हणतात, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.



आता परत त्याच चौकोनातील ' Delete Files... ' वर क्लिक करा. त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' Delete all offline content ' पुढील चौकोनावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट वरील जास्त वेळ पाहीलेली चित्रे कॉम्प्युटर एका लपविलेल्या ' Temp ' या फोल्डरमध्ये साठवितो, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.


आता परत त्याच चौकोनातील ' Clear History ' या बटणाच्या बाजूला ' 20 ' असे लिहिलेले आढळेल, याचा अर्थ कॉम्प्युटर मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद त्याच्या ' Address Bar ' मध्ये साठवितो. तिथे त्या ' Clear History ' ह्या बटणावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा. परंतू यामूळे ' Address Bar ' मधिल सर्व वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होईल, असे केल्याने कॉम्प्युटर काहिही नुकसान होत नाही फक्त वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होते.




टिप : इंटरनेट एक्सप्लोररमध्ये मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद इथे असते, जर आपण ते बदलून १ दिवस केल्यास प्रत्येक दिवसानंतर त्या दिवशी पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद आपोआप नाहिशी होईल.


वर सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट लक्ष्यात असू द्या तुम्ही पुरावा कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या पेक्ष्या हुशार माणूस तुम्हाला शोधू शकतो.

निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट

१. www.statusdetect.com - या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य' असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता.

२. www.yahoo.com - या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्‍याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर yahoo.com अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा.

३. www.easycalculation.com - या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता.

४. www.transferbigfiles.com - या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता.

५. www.downforeveryoneorjustme.com - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता.

६. www.dontclick.it - इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे.

७. www.pimpmysearch.com - या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल.

८. www.cooltoad.com - जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो.

९. www.meebo.com - याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते.

१०. www.howstuffworks.com - सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे.

११. www.ehow.com - एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे.

१२. www.bugmenot.com - बर्‍याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते.

१३. www.computerpranks.com - कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा.

कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता तपासा

साधारणपणे आपण प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो. म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठलाही व्हायरस घुसून कॉम्प्युटर बिघडू नये यासाठी आपण चांगल्यातला चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो.

कुठलाही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर हा चांगलाच असतो तो आपआपल्यापरीने कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर जर वेळोवेळी अपडेट केल्यास तो चांगल्याप्रकारे काम करतो. असे असले तरी आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता किती आहे हे आपणास माहित नसते. आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर एखादा व्हायरस लगेच शोधू शकतो का? हे पडताळण्यासाठी आपणच त्याती परीक्षा घेवूया. म्हणजेच एक खोटी व्हायरस सदृश फाईल बनवून ती फाईल कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर शोधतो का ते पहायचे. खरंतर ही फाईल व्हायरस नसुन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला फसविण्यासाठी हा प्रयत्न आहे.

१. Start > Programs > Accessories मधिल Notepad प्रोग्राम सुरु करा.




२. आता आपल्यासमोर नोटपॅड प्रोग्राम सुरु होईल. त्यामध्ये खाली दिलेली ओळ कॉपी/पेस्ट करा.

X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*



३. आता इतर काहिही टाईप न करता ती फाईल virus.com नावाने कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.

४. आता आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सुरु करुन कॉम्प्युटर स्कॅन करा. पहा जर ती फाईल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने दाखविली तर चांगलेच आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा.

कॉम्प्युटर व्हायरसला आळा कसा घालावा ?

१. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपल्या कॉम्प्युटरला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने संपूर्ण स्कॅन करुन घ्यावे.

२. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपण जो अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरता तो त्या कंपनीच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन अथवा अपडेशनचा पॅच डाऊनलोड करुन अद्ययावत करावा.

३. दुसर्‍यांच्या कॉम्प्युटरमधिल कुठलीही फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी करण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.

४. ईमेलद्वारे आलेल्या कुठल्याही फाईलीली डाऊनलोड करुन उघडून पहाण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.

५. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ऑटो अनेबल मोडवर ठेवावे म्हणजेच ते आपणहून व्हायरस शोधण्याचे काम दरवेळी करीत राहील म्हणजेच कुठलाही व्हायरस सापडल्यास अथवा आढळल्यास त्वरीत त्याची सुचना तो देतो

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काम कसे करते ?

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल सर्व फाईल्समधिल प्रोग्राम चाळून त्यामध्ये इतर फाईलींना खराब करणारा अथवा आपणहून इतर फाईलींमध्ये शिरणारा प्रोग्राम असल्याची सुचना असलेल्या फाईली शोधण्याचे काम करते. एखाद्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शोधण्याच्या प्रकारामध्ये दोन विभाग पडतात. १) तंतोतंत नावाने शोध २) व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध. या दोन प्रकारातील व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध हा प्रकार जास्त प्रभावशाली असतो कारण मुळात एखाद्या फाईलचे नाव आणि स्वरुप काहीही असो त्यातील प्रोग्राममधिल कृती व्हायरसप्रमाणे आहे का या गोष्टीचा शोध या प्रकारामध्ये घेतला जातो.

एखादे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्यात कितीही कार्यक्षम आणि प्रभावी असले तरी व्हायरस बनविणारे देखिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा अभ्यास करत असतात आणि कुठल्याही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येणार नाही नविन वेगळा आणि उपद्रवी व्हायरस बनवितात. अशावेळी नविन व्हायरस जुन्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येत नाही व तो व्हायरस खुशाल त्या कॉम्प्युटरमध्ये आपले काम करत राहतो.

ज्याप्रमाणे कुठल्याही औषधाची एक अंतिम मुदत (Expire Date) असते त्याच प्रमाणे कुठलेही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काही महिन्यानी थोडेफार कमकुवत बनते म्हणजेच नविन आलेल्या व्हायरसला ते शोधू शकत नाही. म्हणूनच या जुन्या झालेल्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर्सना वेळोवेळी अद्ययावत (Upgrade/Update) करणे आवश्यक असते. सध्या सर्वच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर बनविणार्‍या कंपन्या त्यांच्या सॉफ्टवेअरसाठी वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर नविन व्हायरस शोधण्यासाठीचे व त्यांचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे प्रोग्राम मोफत देतात.

कॉम्प्युटर व्हायरस

व्हायरस म्हणजे विषाणू. ज्याप्रमाणे हानिकारक डासांद्वारे आपल्या शरीरामध्ये विषाणूंचा प्रसार होवून एखादी व्यक्ती आजारी पडते त्याचप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये असलेल्या हानिकारक/अनावश्यक प्रोग्राममूळे कॉम्प्युटरमधिल व्यवस्थित चालणार्‍या प्रोग्राम्सना आणि कॉम्प्युटरच्या स्वतःच्या फाईली जाणूनबुजून खराब केल्या जातात. परिणामी चांगला चालणारा कॉम्प्युटर बिघडतो.

कॉम्प्युटर व्हायरस बनविणारी व्यक्ती नक्किच विकृत बुद्धिची असते, यात वाद नाही. कारण मुळात इतरांना त्रास देवून आनंदी होणारी व्यक्ती चांगली असूच शकत नाही.

सर्वच व्हायरस आपला कॉम्प्युटर बिघडवितात असे नाही. तर प्रत्येक व्हायरस हा तो बनविणार्‍या (विकृत बुद्धिच्या) प्रोग्रामरने सांगितलेल्या सुचनेप्रमाणे काम करतो. एकेकाळी व्हायरस म्हणजे कॉम्प्युटर बिघडविणारा प्रोग्राम असा समज होता. सध्याच्या काळातील व्हायरस हा निरनिराळ्या प्रकारे काम करतो. फक्त इतरांचे कॉम्प्युटर बिघडविणे या व्यतिरीक्त त्यांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरणे, एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी करणे, क्रेडीट कार्डची माहिती शोधून ती पाठविणे, पासवर्ड शोधणे. इ. अशा प्रकारे इतरांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरुन तो व्हायरस बनविणारा प्रोग्रामर त्याचा काय उपयोग करीत असेल हे सांगण्याची गरज नाही.

कॉम्प्युटर व्हायरस हा तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागला जातो.

१. व्हायरस (Viruses)
२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses)
३. वर्म (Worms)




१. व्हायरस (Viruses) : म्हणजे एखाद्या प्रोग्रामरने बनविलेला असा एखादा छोटासा प्रोग्राम अथवा प्रोग्रामचा छोटासा भाग ज्याचा उद्देश दुसर्‍याच्या कॉम्प्युटरमधिल फाईली खराब करुन कॉम्प्युटरला बिघडविणे हा असतो.

२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरमधिल एखाद्या अथवा सर्वच सॉफ्टवेअर तसेच इतर ऍप्लिकेशन्सना इजा पोहचविणे या विध्वंसक उद्देशाने बनविला जातो.

३. वर्म (Worms) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरच्या मेमरीला इजा पोहचविण्याचे तसेच कॉम्प्युटरमधिल गोष्टींची/फाईलींची स्वतःहून अनावश्यक अनेक डुप्लीकेट फाईलींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने बनविला जातो.

सध्या प्रामुख्याने एखाद्या गोष्टीच्या (एखाद्य सोफ्टवेअरच्या, वेबसाईटच्या, वस्तुच्या, औषधाच्या) जाहिरातीसाठी या वरील तीन व्हायरसच्या प्रकारांचा उपयोग केला जातो.

Monday, June 21, 2010

सुपरफास्ट’ कॉम्प्युटर

तुम्ही अजूनही पेंटिअम सिरिजचे कॉम्प्युटर वापरता का ? तर तुम्ही अजुनही मागच्या जगात वावरता आहात.. कारण पेंटिअम सिरिजनंतर आलेले ‘ कोअर टू ड्युओ ‘ देखिल आता जुना झाला… त्यांच्या जागी इंटेलने आपला सर्वात फास्ट असा ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर लॉंच केला. हा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा इंटेलचा दावा आहे.
आज देशात वापरल्या जाणा-या बहुतांशी कॉम्प्युटरमध्ये इंटेल प्रोसेसर वापरले जातात. तसेच कॉम्प्युटरचा वापरही आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इंटरनेट सर्फिंग, विडिओ एडिटिंग, गेमिंग आणि रेग्युलर कॉम्पयुझिंगसाठी ‘ हाय स्पीड ‘ ही गरज बनली आहे. त्यासाठीच इंटेलने ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर बाजारात आणालाय, असे इंटेलचे मार्केटिंग डायरेक्टर प्रकाश बगरी यांनी सांगितले.
कॉम्पयुझरच्या नव्या गरजा लक्षात घेऊन ‘ नेहलम प्रोसेसर ‘ या नव्या मालिकेअंतर्गत इंटेलने आणलेला ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा पहिलाच प्रोसेसर आहे. ९६५, ९४० आणि ९२० या तीन सिरीजमध्ये आणलेले हे प्रोसेसर जे अनुक्रमे ३.२० गिगाहर्टझ, २.९३ गिगाहर्टझ आणि २.६६ गिगाहर्टझ या क्लॉकस्पीडमध्ये बाजारात उपलब्ध असतील. हे प्रोसेसर डीडीआर३-१०६६ मेमरीला सपोर्ट करतील. त्यामुळे हे प्रोसेसर भन्नाट स्पीडचा अनुभव देतील, असे इंटेलचे म्हणणे आहे.
‘ कोअर टू ड्युओ ‘ मध्ये नसलेले सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे टर्बो बुस्ट टेक्नोलॉजी. या तंत्रामुळे गेमिंग, सर्फिंग सारख्या हायस्पीड गरजा पूर्ण करणे सोपे होईल. तसेच या तंत्रामुळे वीजेचा अतिरिक्त वापर टळून कॉम्प्युटर चांगला वेग देऊ शकतो. तसेच सर्व्हर टेक्नॉलॉजीसाठी हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरेल, असा इंटेलने स्पष्ट केले आहे.

Saturday, June 19, 2010

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स










सर्वसामान्य शॉर्टकट्स

* CTRL+C : कॉपी

* CTRL+X : कट

* CTRL+V : पेस्ट

* CTRL+Z : अनडू

* DELETE : डिलिट

* SHIFT+DELETE : एखादी फाईल कायमची डिलिट करण्यासाठी

* F2 key : रिनेम : फाईलचे नाव बदलण्यासाठी

* SHIFT : एकापेक्षा जास्त गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी

* CTRL+A : सिलेक्ट ऑल : सर्व सिलेक्ट करण्यासाठी

* F3 key : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

* ALT+F4 : चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी

* CTRL+F4 : एखाद्या प्रोग्राममधिल चालू फाईल बंद करण्यासाठी

* ALT+TAB : चालू असलेल्या प्रोग्राममध्ये स्थलांतर करण्यासाठी

* ALT+ESC : प्रोग्रामांमध्ये उघडलेल्या क्रमाने स्थलांतर करण्यासाठी

* SHIFT+F10 : एखाद्या सिलेक्ट केलेल्या गोष्टीसाठी शॉर्टकट

* CTRL+ESC : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

* F10 : चालू प्रोग्रामचा मेनू बार उघडण्यासाठी

* F5 : चालू प्रोग्राम रिफ्रेश (अद्ययावत) करण्यासाठी

* ESC : चालू प्रोग्राममधिल एखादी घटना (कमांड) रद्द करण्यासाठी

* CTRL+SHIFT+ESC : टास्क मॅनेजर सुरु करण्यासाठी


कि-बोर्ड वरील विंडोज बटणातील शॉर्टकट्स


* Windows Logo : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

* Windows Logo + BREAK : 'System Properties' सुरु करण्यासाठी

* Windows Logo + D : डेस्कटॉपवर जाण्यासाठी

* Windows Logo + M : सर्व चालू प्रोग्राम मिनिमाईझ करण्यासाठी

* Windows Logo + E : 'My Computer' सुरु करण्यासाठी

* Windows Logo + F : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

* Windows Logo + F1 : विंडोज हेल्प सुरु करण्यासाठी

* Windows Logo + L : कि-बोर्ड लॉक करण्यासाठी

* Windows Logo + R : विंडोज रन सुरु करण्यासाठी

* Windows Logo + U : 'Utility Manager' सुरु करण्यासाठी


इतर वेगळी शॉर्टकट्स


* Right SHIFT आठ सेकंद दाबून धरल्यास : Switch FilterKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


* Left ALT+left SHIFT+PRINT SCREEN : Switch High Contrast चालू अथवा बंद करण्यासाठी


*Left ALT+left SHIFT+NUM LOCK : MouseKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


*SHIFT सलग पाच वेळा दाबल्यास : StickyKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


* NUM LOCK पाच सेकंद दाबून धरल्यास : ToggleKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


विंडोज एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स


* END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी

* HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी

* NUM LOCK + Asterisk sign (*) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी

* NUM LOCK + Plus sign (+) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी

* NUM LOCK + Minus sign (-) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी

* LEFT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला उघडण्यासाठी

* RIGHT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी


इंटरनेट एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स



* CTRL + B : 'Organize Favorites' चालू करण्यासाठी

* CTRL + E : 'Search bar' चालू करण्यासाठी

* CTRL + F : ' Find ' : शोधण्यासाठी

* CTRL + H : ' History ' : आधी पाहीलेल्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

* CTRL + I : 'Favorites' आवडत्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

* CTRL + L : नविन वेबसाईट उघडण्यासाठी

* CTRL + O : नविन वेबसाईट उघडण्यासाठी

* CTRL + N : नविन पानामध्ये चालू असलेली वेबसाईट पून्हा उघडण्यासाठी

* CTRL + P : प्रिंट करण्यासाठी

* CTRL + R : ' Refresh ' : चालू वेबसाईटचे पान अद्ययावत ( रिफ्रेश ) करण्यासाठी


टिप : नक्कीच तुम्हाला वर सांगितलेल्या काही गोष्टी कळल्या नसतील, पण तुम्ही वापरुत तर बघा. बहूतेक तुमच्या उपयोगाच्या असू शकतात.

विंडोजमधील चुकीची नोंद (Windows Error Reporting)


विंडोजमध्ये काम करताना बर्‍याच वेळा एखादी (कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअरद्वारे) चूक झाल्यास आपल्यासमोर आपोआप एक चौकोन येतो ज्यामध्ये “The system has recovered from a serious error” म्हणजेच एका मोठ्या समस्येमधून आपला कॉम्प्युटर वाचला आहे असा संदेश असतो.

याच चौकोनामध्ये 'Send Error Report' व 'Don't Send' अशी दोन बटण असतात. याचा अर्थ आत्ता आपल्या कॉम्प्युटरला जी समस्या आली होती तीची नोंद आपणास मायक्रोसॉफ्टकडे करायची आहे का? इथे बर्‍याच वेळा आपण आपल्या डोक्याला त्रास नको म्हणून 'Don't Send' या बटणावर क्लिक करुन (म्हणजेच या समस्येची नोंद आम्हाला करायची नाही) तो चौकोन घालवीतो. पण त्यासोबत तो प्रोग्राम देखिल बंद होतो.

खरंतर विंडोजमधील ही सोय आपणास मदत करण्यासाठी बनविली आहे. जेणेकरुन विंडोज वापरणार्‍यांना येणार्‍या चुका सुधारुन त्यांना अधिक चांगले सॉफ्टवेअर बनविता यावे. परंतू शक्यतो बहूतेक सर्व 'Don't Send' या बटणावर क्लिक करुन ती नोंद मायक्रोसॉफ्टला न पाठविणेच पसंत करतात. त्यांना खरंतर या येणार्‍या चौकोनाची गरज वाटत नाही.

आपणास जर विंडोजमधील चुकीची नोंद विचारण्यासाठी येणार्‍या चौकोनाला बंद करायचे असल्यास खालील प्रक्रिया करा.

१. डेस्कटॉपवरील वर माऊसने राईटक्लिक करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील खालील ' Properties ' वर क्लिक करा.



२. आता आपल्यासमोर System Properties चा चौकोन उघडेल. त्यातील वरील 'Advanced' या विभागातील 'Error Reporting' या बटणावर क्लिक करा.



३. आता आपल्यासमोर अजून एक Error Reporting चा छोटा चौकोन उघडेल. त्यातील 'Disable error reporting' वर क्लिक करुन 'OK'. आता मगाचचाच System Properties चा चौकोन देखिल बंद करा.


४. बस्स इतकेच केल्याने विंडोजमधील चुकीची नोंद करण्याची सोय म्हणजेच Windows Error Reporting बंद होईल. पून्हा जेव्हा कधी आपणास त्याला पून्हा सुरु करायचे असल्यास पून्हा वरील प्रमाणे क्रिया करा.

इंटरनेटचा वेग (Speed) वाढवा!

आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग (Speed) वाढविण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्येच सोय केलेली असते. प्रत्यक्षात इंटरनेटचा वेग हा आहे तेवढाच असतो, पण आपल्या कॉम्प्युटरमधिल विंडोजमध्येच एका जागी तो वेग थोडासा कमी केलेला असतो. याच जागी जर आपण वेग थोडासा कमी करण्याची कमांड बदलून व्यवस्थित दिल्यास थोड्याप्रमाणामध्ये इंटरनेटचा वेग वाढू शकतो.

खाली दिल्याप्रमाणे जर आपण बदल केल्यास आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग थोड्याप्रमाणामध्ये वेग वाढू शकतो.

१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.


२) आता आपल्यासमोर "Group Policy" नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.


३) या "Group Policy" प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy मधिल Computer Configuration मधिल Administrative Templates मधिल Network मधिल QoS Packet Scheduler वर क्लिक करा.


४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " limit reservable bandwidth " वर डबल क्लिक करा.


५) आता आपल्यासमोर limit reservable bandwidth Properties चा चौकोन उघडेल. त्यातील ' Enabled ' वर क्लिक करुन खालील जागेतील Bandwidth limit % समोरील संख्या बदलून त्याजागी शून्य (०) ही संख्या टाईप करा आणि 'OK' बटणावर क्लिक करा.


६) आता पाहा पुढल्या वेळेसे इंटरनेट वापरताना थोडाफार फरक जाणवतो का?

विंडोज XP मधिल खराब झालेल्या फाईल्स दुरुस्त करा.

बर्‍याच वेळेस एखादे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधून काढल्यानंतर अथवा एखादे हार्डवेअर काही काळानंतर ते कॉम्प्युटरमधून Remove/Uninstall केल्यानंतर त्याचा प्रोग्रॅम काढल्यानंतर एखादा एरर चा मॅसेज विंडोज सुरु करताना येतो. म्हणजेच त्या प्रोग्रॅम अथवा हार्डवेअरच्या फाईल्स अथवा डाईव्हर्स काढताना त्यामध्ये विंडोज XP च्या काही महत्त्वाच्या फाईल्स देखिल डिलीट झाल्या असल्यास त्यामूळे विंडोज XP मध्ये काही प्रोग्रॅम्सना प्रॉब्लेम येते असल्यास एरर चा मॅसेज विंडोजच्या सुरुवातीला दाखविला जातो.

हा प्रोब्लेम प्रामुख्याने विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये निर्माण झालेने विंडोजच्या सुरुवातीलाच हा एरर मॅसेज दाखविला जातो. विंडोजमधिल काही महत्त्वाच्या फाईल्स डिलीट झाल्याने तसा एखादा मॅसेज दाखविला जातो. विंडोज रजिस्ट्रीमध्ये निर्माण झालेला हा प्रोब्लेम ठिक करण्यासाठी "रजिस्ट्री क्लिनर" सारखे प्रोग्रॅम्स वापरले जातात (असे प्रोग्रॅम्स इंटरनेटरवर मिळतात) पण बर्‍याच वेळेस आपण स्वतः देखिल अशा प्रोग्रॅम्सशिवाय विंडोजमधिल एखादा एरर ठिक करु शकतो. हा एरर काढण्यासाठी देखिल विंडोजमध्ये सोय केलेली आहे.

विंडोजमध्ये मध्ये त्यासाठी SFC SCAN ही कमांड वापरली जाते. या कमांडद्वारे विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये डिलीट अथवा खराब झालेल्या फाईल्स शोधून त्या बदलल्या जातात व निर्मा़ण झालेला प्रोब्लेम ठिक केला जातो व नंतर विंडोजच्या सुरुवातीलाच येणारा एरर मॅसेज बंद होतो. अशाप्रकारे SFC SCAN ही कमांड वापरताना विंडोजची म्हणजेच आपण जर विंडोज XP वापरत असाल तर विंडोज XP ची CD अथवा विंडोज VISTA वापरत असाल तर विंडोज VISTA ची CD विचारली जाते, ती CD ड्राईव्हमध्ये असणे आवश्यक आहे.

ही कमांड वापरण्याची क्रिया खाली दिली आहे.





१. स्टार्ट बटणावरील 'रन' या बटणावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर 'रन' या विभागातील विंडो उघडेल. त्यामध्ये cmd हे टाईप करुन 'OK' या बटणावर क्लिक करा.



३. आता आपल्यासमोर काळ्यारंगाची डॉस प्रॉम्प्टची विंडो उघडेल, त्यामध्ये sfc/scannow असे टाईप करुन एंटरचे बटण दाबा व ती डॉस प्रॉम्प्टची काळी विंडो बंद करा.


४. आता आपल्यासमोर 'Windows File Protection' चा प्रोग्रॅम सुरु होईल. लक्षात असू द्या हा प्रोग्रॅम वापरताना वर सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये सीडी असणे आवश्यक आहे.

एका क्लिकने कॉम्प्युटर बंद करा.

आपण जेव्हा कॉम्प्युटर बंद करण्यासाठी 'Turn Off Computer' ची सुचना देतो तेव्हा प्रत्यक्ष्यात कॉम्प्युटरमध्ये 'कॉम्प्युटर बंद होण्याचा प्रोग्राम' सुरु होतो. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विंडोजमध्ये निरनिराळे प्रोग्राम/सॉफ्टवेअर सुरु करतो त्याचप्रमाणे कॉम्प्युटर बंद करताना देखिल त्याचप्रमाणे बंद होण्याचा प्रोग्राम सुरु होतो.

काम करण्याच्या पद्धतीजरी सर्वांच्या निरनिराळ्या असल्यातरी कॉम्प्युटर बंद करताना सर्वजण एकाच पद्धतीने Start बटणावरील 'Turn Off Computer' या विभागाद्वारे कॉम्प्युटर बंद करतात.

खाली दिलेल्या पद्धतीने आपण माऊसच्या एकाच क्लिकने कॉम्प्युटर बंद करण्याची सुचना देवू शकता.

१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसने राईटक्लिक करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील 'New' या विभागातील 'Shortcut' या बटणावर क्लिक करा.


२. आता आपल्यासमोर Create Shortcut चा चौकोन सुरु होईल त्यातील खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत Shutdown -s -t 03 -c "Bye Bye !" हे टाईप करा आणि खालील Next > या बटणावर क्लिक करा.



३. आता आपल्यासमोर येणार्‍या चौकोनात खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत 'Shut Down' असे टाईप करा व खालील 'Finish' बटणावर क्लिक करा.


४. आता डेस्कटॉपवर 'Shut Down' नावाचा आयकॉन तयार होईल. त्याला माऊसने दाबून ( Draging ) विंडोजवरील Task Bar मधिल ' Quick Launch ' या विभागामध्ये नेवून सोडा. असे केल्याने त्याजागेमध्ये कॉम्प्युटर बंद करण्यासाठी एक शॉर्टकट आयकॉन तयार होईल.



५. बस्स. इतकेच करायचे आहे. आता यापूढे जेव्हा आपणास कॉम्प्युटर बंद करायचा असेल तेव्हा फक्त या छोट्या आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कॉम्प्युटर बंद होईल.


टीप : याच प्रमाणे कॉम्प्युटर बंद करुन सुरु (Restart) करण्यासाठी Shutdown -t असे देवून आपण नविन शॉर्टकट आयकॉन बनवू शकता.

जगातून कुठुनही आपला ( घरचा अथवा ऑफिसचा ) कॉम्प्युटर चालवा !


आता आपण कुठूनही आपल्या घरचा अथवा ऑफिसचा कॉम्प्युटर चालवू शकता आणि तसे करण्यासाठी प्रत्यक्ष तेथे असण्याची गरज देखिल नाही. यालाच 'रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस' ( Remote Computer Access ) असे म्हणतात.

बरेच वेळा असे होते की आपण आपली सर्व महत्त्वाची कामे ऑफिसच्या कॉम्प्युटरवर करत असतो. आणि घरी आल्यावर ऑफिसमधल्या कॉम्प्युटरवरची एखादी महत्त्वाची फाइल हवी असते किंवा एखाद्या वेळी आपण बाहेरच्या गावी गेल्यावर आपला ऑफिसशी संबंध तुटतो म्हणजेच आपल्या ऑफिसमधल्या कॉम्प्युटरशी संबंध तुटतो. अशा वेळी कुठूनही खरंच जगातून कुठूनही आपला कॉम्प्युटर चालवू शकलात तर ऑफिसमध्ये नसून देखिल तुमचे काम थांबणार नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे 'रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस' अगदी मोफत आहे आणि फार सोपे देखिल.

टीप :- रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी साहजिकच दोन्ही ठिकाणी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

अशाप्रकारच्या 'रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस' सेवा मोफत अथवा विकत देणार्‍या काही मोजक्याच कंपन्या सध्या उपलब्ध आहेत. परंतू त्यातील LogMeIn या कंपनीने पुरविलेली "मोफत रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस" सेवा फारच चांगली आहे. कारण यामध्ये आपण मोफत एक, दोन नाही तर जवळ-जवळ पाच कॉम्प्युटर्स जगातून कुठूनही चालवू शकतो.

सुरवातीला एकदाच LogMeIn या कंपनीच्या वेबसाइटवर मोफत खाते उघडल्यानंतर आपणास ज्या कॉम्प्युटरला आपणास ज्या कॉम्प्युटरला दुसरीकडून हाताळायचे असेल त्यामध्ये LogMeIn चा एक Free LogMeIn असा प्रोग्रॅम एकदाच त्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून लोड करावा लागतो. हे फारच सोपे असते. एकदा का तो प्रोग्रॅम त्या कॉम्प्युटरमध्ये लोड झाला की तो कॉम्प्युटर आपल्या खात्यामध्ये जमा होतो. नंतर आपण कुठूनही (एखाद्या सायबर कॅफेतूनदेखील) LogMeIn च्या वेबसाइटवर आपले खाते उघडून त्यामध्ये आपण जमा केलेल्या निरनिराळ्या कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करून त्यामध्ये काम करू शकतो. या सर्व गोष्टी पासवर्ड देऊन केल्या जात असल्याने सर्व सुरक्षित असतात. फक्त आपला पासवर्ड कुणाला सांगू नका.

दुसर्‍या ठिकाणाहून आपल्या घरचा अथवा ऑफिसचा कॉम्प्युटर LogMeIn द्वारे उघडल्यानंतर आपण जणूकाही त्या घरच्या अथवा ऑफिसच्या कॉम्प्युटर प्रत्यक्ष काम करीत आहोत असे अनुभवता येते. कारण घरच्या अथवा ऑफिसच्या कॉम्प्युटर जसाच्यातसा आपल्या समोर दिसू लागतो, त्यातील सर्व प्रोग्रॅम्स, सर्व फाइली, आपले इ-मेल्स, सर्व फोल्डर्स, सर्वकाही म्हणजेच तोच कॉम्प्युटर दिसू लागतो, इतकेच की त्यावरुन आपण प्रिंटींग देखिल करू शकतो, इतकेच की त्या कॉम्प्युटरवरील गाणी ऐकू शकतो तसेच पिक्चर देखिल पाहू शकतो. त्यामुळे घरी अथवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष नसलो तरी आपले कुठलेच काम थांबत नाही. एखादा इ-मेल उघडून बघायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्यावेळेच्या आधीच आपण तो दुसरा कॉम्प्युटर उघडून हाताळू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी त्या दोन्ही ठिकाणी इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे. तसेच ज्या कॉम्प्युटरला आपणास उघडायचे असेल त्यामध्ये LogMeIn चा प्रोग्रॅम असणे आवश्यक आहे.

रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस कसा करायचा?


आपल्या खात्यातील एखादा कॉम्प्युटर 'LogeMeIn Free' द्वारे ऍक्सेस करण्याची क्रिया खाली दिली आहे.

१) इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राऊझरमध्ये www.logmein.com ही वेबसाइट उघडा.

२) वेबसाइट उघल्यावर त्या वेबाइटवर वर उजव्याबाजूस आपणास Login ची सोय दिसेल तेथे आपल्या खात्याच्या ई-मेल आणि पासवर्डने लॉगीन करा.


३) लॉगीन करताच आपण आपल्या खात्यामध्ये पोहोचता. येथे आपणास आपण जमा केलेल्या कॉम्प्युटरची यादी दिसेल. जे कॉम्प्युटर त्यावेळी सुरु असतील त्यांची नावे ठळक असतील तर बंद असलेल्या कॉम्प्युटरच्या नावापुढे Offline असे दिले असेल. आपणास ज्या चालू कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा.


४) आता आपल्यासमोर Connecting.... चे पान उघडेल, आता त्या कॉम्प्युटरशी संपर्क सुरु असतो.



५) आता आपल्यासमोर Computer Access Code विचारला जाईल. तो व्यवस्थित दिल्यानंतरच आपणास पुढे प्रवेश मिळेल.


६) आता येणार्‍या पानावरील Remote Control या बटणावर क्लिक करुन आपण तो कॉम्प्युटर ऍक्सेस करु शकता, म्हणजेच तो कॉम्प्युटर जसाच्यातसा आपल्यासमोर दिसेल आणि आपण त्यावर जणूकाही तीथे बसून काम केल्याप्रमाणे काम करु शकता.



७) आता तो कॉम्प्युटर उघडेल. या सोबत तेथे Full Screen मध्ये बघण्याची देखिल सोय असेल.

८) आपले काम झाल्यानंतर पून्हा मगाचच्याच पानावर जाऊन Disconnect या बटणावर क्लिक करा.

तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?

बर्‍याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.

कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.

कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.

१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिन‍अप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.

Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.








२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन' [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.


३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार स्लो होतो.

- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.





या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

४) कॉम्प्युटर सुरु होताना इतर बरेच अनावश्यक प्रोग्राम सुरु होतात. असे अनेक अनावश्यक प्रोग्राम कॉम्प्युटर सुरु होताना चालू होतात जे चालू जरी नाही झालेत तरी काहीच फरक पडत नाही. परंतु ते सुरवातीला चालू होत असल्याने आपला कॉम्प्युटर स्लो होतो. अशा अनावश्यक चालू होणाऱ्या प्रोग्राम्सना सुरु होण्यापासून थांबवण्यासाठी खाली सांगितल्याप्रमाणे करावे.

- Start - Run वर क्लिक करावे. आता Msconfig टाईप करुन 'OK' करावे त्यामूळे स्क्रिनवर System Configuration Utility असा प्रोग्राम चालू होईल.






या प्रोग्राममध्ये इतर कुठल्याही विभागामध्ये न जाता सरळ 'Startup' ह्या विभागावर क्लिक करावे. इथे 'Startup Item' या नावाखाली तुम्हाला काही नावांची मोठी यादी [ List ] दिसेल व त्याच्या पूढे [ ] असे बरोबरचे चिन्ह असेल, त्या यादीतील सर्व [ ] असे बरोबरच्या चिन्हावर क्लिक करुन ते बंद करावे. नंतर 'Apply' व नंतर 'Close' बटनावर क्लिक करावे. या नंतर कॉम्प्युटर 'Restart' चा मेसेज देईल व कॉम्प्युटर एकदा बंद होऊन पुन्हा सुरु होईल. यामुळे अनावश्यक असलेले बरेच प्रोग्राम कॉम्प्युटर दरवेळेस सुरु करणार नाही.


५) सध्या इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवर कॉम्प्युटरचा तसेच इंटरनेटचा वेग वाढविणारे अनेक प्रोग्राम मोफत मिळतात. परंतू त्यातील नक्की कुठला प्रोग्राम चांगला हे ओळखणे कठीण असते, कारण चांगल्या नावाने हानिकारक प्रोग्राम देखिल मिळू शकतात, याला पर्याय म्हणजे नविन एखादा प्रोग्राम पडताळण्यापेक्ष्या जास्त वापरला जाणारा आणि अनेकांनी सुचविलेलाच प्रोग्राम वापरणे योग्य. सध्या ' CCleaner ' हा जास्त ओळखला जातो, याचे कारण म्हणजे तो इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, फायरफॉक्स या ब्राऊझरच्या तात्पुरत्या नको असलेल्या फाईल्स डिलिट करतो, विंडोज मधिल अनावश्यक फाईल्स, लॉग फाईल्स डिलिट करतो, सॉफ्टवेअरच्या कॉम्प्युटरमधल्या नोंदी व्यवस्थित करतो तसेच तो १००% हानिकारक नाही.

' CCleaner ' सॉफ्टवेअर बद्दल अधिक माहितीसाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

तुमच्या लॅपटॉपची अथवा कॉम्प्युटरची काळजी कशी घ्याल?

१. आपण ज्या ठिकाणी लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर काम करता ती जागा शक्यतो स्वच्छ असावी.

२. शक्यतो थंडगार वातावरणामध्ये काम करावे - लॅपटॉपवर एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअरवर काम करताना लॅपटॉपची जास्त शक्ती वापरली जाऊन तो पटकन गरम होतो. म्हणून शक्यतो लॅपटॉपवर थंडगार वातावरणामध्ये काम करावे. तसेच लॅपटॉपच्या मागच्या बाजूस असलेल्या फॅनची जागा मोकळी असावी, जेणेकरून आतील गरम हवा व्यवस्थित बाहेर जाईल.

३. लॅपटॉपच्या स्क्रीनची काळजी घ्यावी - लॅपटॉपची स्क्रीन एल.सी.डी ( LCD - Liquid Crystal Display ) ची असल्याने ती फारच नाजुक असते. शक्यतो तिला हात अथवा बोट लावणे टाळावे. लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना देखिल योग्य त्याच क्लिनिंगच्या साधनांनीच साफ करावी.

४. लॅपटॉपची बाळगताना - लॅपटॉप नेहमी व्यवस्थित हाताळावा. वजनाने हलका असल्याने तो कसाही हाताळू नये. तसेच एखाद्या ठिकाणी त्याला ठेवताना हळूवारपणे ठेवावे. प्रवासामध्ये त्याला जास्त धक्का लागणार नाही व जास्त हालणार नाही अशाच ठिकाणी ठेवावा.

५. लॅपटॉपजवळ पेय पिणे टाळावे - लॅपटॉपवर काम करताना शक्यतो कुठलेही पेय पिणे टाळावे. कारण चुकून त्याचा एखादा थेंब लॅपटॉपच्या कि-पॅडवर पडल्यास प्रॉब्लेम होवू शकतो.

६. धुरळा झटकावा - लॅपटॉपच्या स्क्रीनवर तसेच कि-पॅडवर धुरळा बसू देऊ नये. बर्‍याच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फक्त धुरळ्यामुळे बिघडतात.