Monday, September 20, 2010

संगणक कार्डस


संगणक कार्डस
व्हिडीओ कार्ड :- याना ग्राफिक्स कार्ड ही म्हणतात अशा प्रकारचे कार्ड CPU चे आउट पुट मॉनिटर वर दाखवण्या साठी आपल काम करतात . हे कार्ड CUP मध्ये जोडलेले असते . इलेक्ट्रानिक्स संदेश चे व्हिडीओ मध्ये रूपांतरण करण्याच काम हे व्हिडीओ कार्ड करतात यामुळे आपण दृश मॉनिटर वर पाहू शकतो . याला डिसप्ले कार्ड्स देखिल म्हणतात .



साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .



टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि व्हिडीओ कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट असतो त्या मुळे टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर दिसते . टीव्ही टुनेर कार्ड मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य . अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच मदर बोर्ड वर बसवलेले असते . जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर वर पाहु शकत नाही म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक विशिष्ट आहे की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .


ऐक्सटेर्नल कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी टुनेर कार्ड असते । एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड मध्ये वेगळी पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक वैशिष्ठ आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही . केवल मॉनिटर च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो. दोन्ही प्रकारच्या टीव्ही टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल मिळतो.

Sunday, September 19, 2010

प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स !

माउस नीट चालत नसेल तर ?

१) माउस साफ़ करावा .
माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ काढावी .
२) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा.
३) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे .
४) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही .
५) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .


कीबोर्ड चालताच नसेल तर ?
१) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .
२) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .
३) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .
४) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .


पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल तर ?

१) पॉवर कनेक्शन चेक करावे .
२) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .
३) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .
४) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.
५) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत असेल .
६) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .
७) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .



पीसी स्लो (Slow) झाला असेल तर ?

१) पीसी मधील नको असलेल्या फाइल्स डिलीट करावेत .
२) अनवांटेड डाटा काढून टाकावा किवा नको ते प्रोग्राम्स करून टाकावे.
३) पीसी एंटी वायरस सॉफ्टवेर ने स्कैन करून पाहावे .
४) Disk Defragmenter पीसी करून पाहावे ह्या मुळे पीसी मधील डाटा हार्डडिस्क मध्ये सेट होतो ह्या मुळे पीसी फास्ट चालतो .हे करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स मध्ये Accessories वर क्लिक करून System Tools ह्या आप्शन मध्ये हा आप्शन आहे .
5) अन्यथा पीसी फॉर्मेट करावा ।

Saturday, July 3, 2010

संगणक - छोट्यामोठ्या अडचणी व उपाय

आपल्या रोजच्या वापरामध्ये कधी कधी संगणक वापरताना छोटी छोटी अडचण येते व आपण काही करु शकत नाही ह्या भावनेने सरळ रिपेयर करणा-या व्यक्तीला फोन करतो,जरा थांबा, शक्यतो अडचण मोठी नसावी, शक्यतो ती अडचण तुम्ही स्वत:च दुर करु शकाल ह्यामुळे तुमचा वेळ ही वाचेल व पैसा ही. विविध लेखमालेतून आपण सामान्य अडचणी व त्यावर उपाय ह्या वर माहिती घेऊ, मी काय मास्टर नाही आहे, काही अडचणी साठी तुमच्याकडे वेगळा उपाय असू शकतो तेव्हा निसंकोच पणे येथे लिहा.

१. सिडी-रोम / डिव्हीडी रोम चा डिस्क ट्रे बाहेर येतो पण आत जात नाही व सिडी चालवण्यासाठी चार-पाच वेळा प्रयत्न करावा लागतो ?

तुमचा सिडी रोम सिडी व्यवस्थीत रिड करु शकत नाही आहे त्यामुळे तो डिस्क बाहेर पाठवतो आहे, ह्याचे सर्वात कॊमन कारण हे आहे की तुमचा रोमच्या लेन्सवर धुळ बसली आहे व त्यामुळे तो व्यवस्थीत काम करत नाही आहे, मार्केट मध्ये २०-२५ रुपये मध्ये सिडी लेन्स क्लिनर
मिळतो तो वापरा. व ह्याच्या आधी रोम बरोबर आत जोडलेल्या केबल्स (पावर केबल व डेटा केबल) चे कनेक्टर चेक करा, जर ते लुज अथवा व्यवस्थीत बसले नसतील तरी वरील अडचण येऊ शकते.

ही अडचण का येते ? नियमीत पणे सिडी रोमचा वापर न झाल्यामुळे / नियमीत पणे लेन्स क्लिनर न वापरल्यामुळे.

२. मला अटोमेटिक विडोंज अपडेट थांबवायचे आहे काय करु ?

ह्या साठी सर्वात प्रथम Start वर क्लिक करा व RUN च्या खिडकीमध्ये टाईप करा net stop wuauserv व काही सेकंद वाट पहा, एक CMD खिडकी समोर उघडेल व एक संदेश देऊन बंद होईल, झाले तुमचे काम :)

३. माझा संगणकावर नेहमी पाच एक मिनिटाने आपोआप जाहिरातीच्या छोट्यामोठ्या खिडक्या उघडत आहेत काय करु ?

हा स्पायवेयर आहे ! तुम्ही जे डाऊनलोड करु नये / ज्या वेबसाईट वरुन डाऊनलोड करु नये तेथून काहीतरी चुकुन डाऊनलोड केले आहे व त्या चुकी बद्दल तुम्हाला फोर्स केलेल्या जाहिराती तुमच्या इच्छे विरुध्द पाहावी लागत आहे, काळजी नको उपाय आहे. पहिला उपाय सिस्टम रिस्टोर करा, ह्यामध्ये तुम्ही तयार केलेल्या फाईल्स व माहिती जशीच्या तशीच मिळेल व तुमची अडचण दुर होईल, Start नंतर Programs > Accessories > System Tools व येथे तुम्हाला System restore प्रणाली भेटेल ह्याला क्लिक करुन तुम्ही जेव्हा पासून जाहिराती येत आहेत त्याच्या एक-दोन दिवस आधीचा सिस्टम रिस्टोर पॊईन्ट रन करा. १५-२० मिनिटे लागतात एका सामान्य सिस्टम साठी पण अडचण दुर झालेली असेल.

दुसरा उपाय - समजा वरील उपाय तुमच्या उपयोगी आला नाही तर ? सिस्टम रिस्टार्ट करा व बुट स्क्रिन येण्याच्या आधी एक चार पाच वेळा F8 दाबा, येथे तुम्हाला विन्डोज बुटिंग ऒप्शन भेटतील त्यातील सेफ मोड व इंटर करा. काही वेळाने संगणक सेफ मोड मध्ये चालू होईल, संगणकात प्रवेश करण्याआधी तुम्हाला एक रिस्टोर चा ऒप्शन येईल त्याला रद्द करा. व एडमीन अकाऊंटने संगणकात प्रवेश करा (जर एका पेक्षा जास्त युजर संगणक वेगवेगळ्या अकाऊंटने संगणक वापरत असतील तर) व कंन्ट्रोल पॆनल मध्ये जाऊन Add or Remove Programs मध्ये जाऊन तुम्ही मी देत असलेल्या नावाप्रमाणे अथवा नावासारखे जी प्रणाली दिसत असेल त्याला अनईन्स्टॊल करा. उदा. नावे. P2PNET, P2PNETWORK, FILEGRABBER, ALTPAYMENTS, FSUPPORT,ITBILLS, LICENSE MANAGER, MEDIAPIPE, DOWNLOADMANEGER, MOVIE PASS, MOVIELAND, MOVIETUBE, MYFREEMEDIA, MYACCESSMEDIA, MYMEDIA, MEDIAPASS, ADULTPASS, FREEADULTMOVIEPASS, FREEADULTTV, MYTV, FREETV, TV4U.

हे झाल्यावर Windows Explorer उघडा व program files मध्ये जाऊन तुम्ही जी प्रणाली अन ईन्स्टॊल केली आहे त्याच्या रिलेटेड फोल्डर डिलिट करा व स्टार्ट > रन येथे टाईप करा MSCONFIG ईटर केल्यावर एक खिडकी उघडेल त्यामध्ये Startup टॆब वर क्लिक करुन त्यातील लिस्ट मधील तुम्ही काढून टाकलेल्या प्रणाली रिलेडेड जे नाव असेल त्याच्या समोरील टिक मार्क काढा. व ओके वर क्लिक करा. व आपला सिस्टम रिस्टार्ट करा नॊर्मल मोड मध्ये ;) डन काम तमात जहिरातींचे !

ही अडचण का येते ? गरज नसलेल्या जाहिरातीवर / संकेतस्थळावर क्लिक केल्यामुळे व समोर विचारत असलेल्या इनस्टॊल विंडोला न बघताच ओके करण्याच्या सवयी मुळे ;)

४. संगणक चालू केल्या नंतर काही मिनिटामध्येच (१५-३०) बंद पडतो काय करु ?

जर काही चेतावनी न देता संगणक बंद पडत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा प्रोसेसर गरजेपेक्षा जास्त गरम होत आहे व त्यावर लावलेला कुलींग फॆन काम करत नाही आहे, अथवा व्यवस्थीत कुलींग करत नाही आहे ह्या साठी तुम्हाला तुमच्या सीपीयू चे डाव्या बाजूचे पॆनेल उघडावे लागेल व पॅनेल उघडल्यावर परत एकदा संगणक चालू करा व सिपीयूच्या वरती लावलेला फॅन बघा, जर तो फिरत असेल व त्याची स्पीड व्यवस्थीत असेल तर दुसरी अडचण आहे तुम्हाला हार्डवेअर इंजिनियरला बोलवावे लागेल, पण जर व्यवस्तीत फिरत नसेल तर तर व त्यावर धुळ असेल अथवा काही कचरा फसलेला असेल तर संगणक बंद करुन मग साफ करा, शक्यतो हाताने केबल ओढण्याचा प्रयत्न करु नका ज्या आजू बाजूला आहेत, त्यांना सावकाश बाजूला करा व मग फॅन साफ करा. जर तुमच्या कडे हवा मारण्याचे अथवा हवा खेचण्याचे मशीन असेल तर अती उत्तम, सर्व संगणकातील धुळ साफ करुन घ्या. तुमचे काम झाले !

ही अडचण का येते ? प्रोसेसर चे टेंपरेचर हे ६० डिग्रीच्या पुढे गेले की संगणक बंद पडतो, कारण पुढे होणारे नुकसान टाळावे ह्या हेतूने ह्याच्या बाओस मध्ये ही सेटींग बाय डिफाल्ट असते.

Saturday, June 26, 2010

VLC प्लेअर एक परिपुर्ण प्लेअर..............


नमस्कार मंडळी ,
बरेच लोक आजही Windows media player हा गाणी वाजवण्यासाठी व PowerDVD डीवीडी प्ले करण्यासाठी वापरतात. मात्र तुम्ही कधी VLC प्लेअर वापरलाय काय?? मुक्तस्त्रोत असलेला हा प्लेअर तिन्ही ओएस (म्हणजे मॅक ,लिनक्स , विन्डोज ) साठी उपलब्ध आहे .याची विशेषता म्हणजे हा खुप प्रकारचे video FORMATS
प्ले करतो चला याची माहीती घेऊया........


VLC मीडीया प्लेअर हा खालिल गोष्टी प्ले करतो ....
(MPEG-1, MPEG-2, MPEG-4, DivX, mp3, ogg, vob,MPEG (ES,PS,TS,PVA,MP3),AVI,ASF,WMV,WMA,MP4,MOV,3GP,OGG , OGM , Annodex,Matroska (MKV),Real,WAV (incuding DTS),Raw Audio: DTS, AAC,AC3,A52,Raw DV,FLAC,FLV (Flash),MXF,Nut,Standard MIDI , SMF,Creative™ Voice ...) या बरोबरच DVDs, VCDs, आणि बरेच streaming protocols.
तसेच याची नवीन आवृत्ती Real media(.rmv .rm )सुद्दा प्ले करतो..
तसेच हा प्लेअर तुमचे TV TUNER ,WEBCAM सुद्धा चालवतो..
आणि हे सर्व मिळते आपल्याला एका compact view मधे तसेच याची साईज सुद्धा बघावे तर खुप कमी आहे
या प्लेअर मधे काही विशेष गोष्टी आहेत .यात डेक्सटॉप वर विडीओ ला वालपेपर प्रमाणे लावता येते.
तसेच याचे EQUAILIZER खुप शक्तीशाली आहे यात खुप प्रकार आहेत जसे PARTY,ROCK,POP,FULL BASS,HEADPHONE,LIVE ,HALL .

या प्लेअर च्या स्किन्स सुद्धा http://www.videolan.org/vlc/skins.html वर उपलब्ध आहेत :










तसेच यामधे हॉटकीज ची सुविधा आहे. त्या तुम्ही Preferences-->Hotkeys मधे जाउन पाहु शकता.
तुम्ही हा प्लेअर http://www.videolan.org/वरुन डाऊनलोड करु शकता.
धन्यवाद !!
आणि वापरल्यावर प्रतिक्रिया नक्की द्या...

Thursday, June 24, 2010

फाईल एक्सटेंशन वरून फाईलचा प्रकार कसा ओळ्खाल ?

मित्रहो आजकाल अनेक प्रकारचे (softwares and programs ) सॉफ्टवेर्स आणि प्रोग्राम्स बाजारात आले आहेत. आणी विन्डोज़ प्रोग्राम सर्व वाचकाना सोयीस्कर जावे म्हणुन या सर्व प्रोग्राम फाईल्सना एक ओळख देण्यात आली आहे. कोणत्याही फाईल च्या नावापुढे ___.avi, ___.mp3, __.xls असे लिहिलेले असते ना , तीच असते फाईल ची ओळख. यालाच फाईल एक्सटेंशन (extention) असेही म्हणतात . तर आज आपण या सर्व फाईल एक्सटेंशन ची ओळख करून घेणार आहोत.
फाईल एक्सटेंशन हे फाइल चा प्रकार ओळखण्यासाठी वापरले जाते. फाईल च्या नावानंतर पुढे एक टिम्ब आणी तीन अक्षरं असे मिळून फाईल एक्सटेंशन तयार होते. तुमच्या संगणकावर हमखास दिसणारी काही एक्सटेंशन आता आपण पाहुया
* _.au - हे एक्सटेंशन एका साउंड फाईल चे निर्देशक आहे. बरयाच साउंड प्लेयिंग प्रोग्राम्स वर या फाईल चालतात . साउंड प्लेयिंग प्रोग्राम्स म्हणजे अशे प्रोग्राम्स ज्यावर गाणी अथवा चित्रपट पाहता येतात.
* .avi - हे एक्सटेंशन एका विडियो फाईल चे निर्देशक आहे. माइक्रोसॉफ्ट मीडिया प्लेयर (microsoft media player) वर या फाईल्स चालतात.

* .bmp - माइक्रोसॉफ्टच्याच विन्डोज़ पेंट (Windows Paint) प्रोग्राम मध्ये तयार होणारया सर्व चित्रासाठी या एक्स टेंशन चा वापर केला जातो. यालाच बिटमैप (BITMAP) असेही म्हंटले जाते.

* .dll - हे एक्स टेंशन असणार्‍या फाईल जरी नेहमी कम्पुटर वापरताना गरजेच्या नसल्या तरी महत्वाच्या असतात. Dynamic link library असे याचे पूर्ण नाव आहे. यामध्ये कंप्यूटर च्या कामासाठी लागणार्‍या काही कॉमन common फाईल्स ठेवलेल्या असतात. कधी चुकुनही .dll एक्सटेंशन असणार्‍या फाईल डिलीट delete करू नका.

* .exe - हे एक्सटेंशन executable एक्सीक्युटेबल फाईलचे निर्देशक आहे. एक्सीक्युटेबल फाईल म्हणजे असे प्रोग्राम जे कम्पुटर वर चालवल्यावर इन्स्टॉल होतात आणी मग काम चालू करतात. या फाईल्स अतिशय सावधानतेने हाताळाव्या लागतात कारण बरेच वायरस (virus) प्रोग्राम्स .exe या प्रकारात मोडतात.

* .gif - या एक्सटेंशन चा वापर देखिल एक प्रकारची image चित्र फाईल दाखवण्यासाठी होतो. याचे पूर्ण नाव Graphic interchange format ग्राफिक इंटरचेंज फॉर्मेट असे आहे. या फाईल्स .bmp फाईल्स पेक्षा आकाराने लहान असतात आणी त्यामुळेच इंटर नेट वर वापरल्या जाणार्या बरयाच इमेज फाईल्स .gif या एक्सटेंशन च्या असतात .

* .jpg / .JPEG - हे देखिल एका चित्र (image इमेज ) फाईल चे एक्सटेंशन आहे. याचे पूर्ण नाव " Joint Photographers Experts Group.” (जौइंट फोटो ग्राफर्स एक्सपर्ट्स ग्रुप ) असे असून .jpg/ . jpeg या फाईल्स .bmp आणि .gif या दोन्ही प्रकारानपेक्षा खुप लहान असतो अणि म्हनुनच इन्टरनेट वर याचा जास्त वापर होतो.

* .mp3 - हे एक्सटेंशन तुमच्या अधिक परिचयाचे असेलच. म्युझिक फाईल्स (गाणी, आवाज) चा पुर्वीचा आकार (size)कमी करून म्युझिक च्या मूळ प्रतिमध्ये (quality) बदल न करता साठविण्यासाठी .mp3 एक्सटेंशन चा वापर केला जातो..mp3 नाव "Moving Picture Experts Group-1 Audio Layer 3" याचा शोर्टफॉर्म आहे.

* .scr - आपल्या संगणकावर असलेल्या स्क्रीन सेवर screen saver फाईल्स दर्शविण्यासाठी या एक्सटेंशन चा वापर करतात.

* .ttf - True Type Font याचा शोर्टफॉर्म असलेले हे एक्स टेंशन वापरले जाते विविध प्रकारच्या फोंट्स (fonts) फाईलसाठी . Fonts म्हणजे संगणका मध्ये वापरल्या जाणार्‍या विविध अक्षररचना.

* .txt - विन्डोज़ मधील नोटपॅड या ऍप्लिकेशन मध्ये बनलेल्या सर्व फाईल्सना .txt हे एक्सटेंशन असते. नोटपॅड हे माइक्रोसॉफ्ट वर्ड चे एक सोपे रूप आहे. मुख्यतः सॉफ्टवेर प्रोग्रामर्स या फाईल्सचा वापर करतात.

* .wav - विन्डोज़ मीडिया प्लेयर किंवा विन्डोज़ साउंड रेकोर्डर या आप्लिकेशन्स मध्ये वापरल्या जाणार्‍या म्युझिक फाईल्स साथी हे एक्सटेंशन वापरले जाते. परन्तु .mp3 पेक्षा .wav या फाईल्स अधिक जड़ असतात.

* .zip - विन्डोज़ आर्चीव विनझिप ( Windows archieve WINZIP) प्रोग्राम चे हे एक्सटेंशन आहे. बर्याच फाईल्स एकत्र पाठविण्यासाठी त्यांची साईझ कमी करून .zip फाईल्स चा वापर केला जातो.

Tuesday, June 22, 2010

कॉम्प्युटरवरील आपल्या कामाचे पुरावे कसे लपवाल !

बर्‍याच वेळा तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर इतर कुणीही व्यक्ती इतकेच की तुम्हीसुद्धा त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकता. कारण कुणीही एखाद्या कॉम्प्युटरवर केलेल्या कामाची तो कॉम्प्युटर नोंद ( Log ) ठेवतो. ती नोंद पाहून कुणीही त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकतो.

म्हणून तुम्हाला जर तुम्ही केलेल्या कामाची नोंद इतरांपासून लपवायची असेल तर त्यासाठी खाली काही पर्याय दिले आहेत. पण एक लक्ष्यात असू द्या ते म्हणजे, असे कुठलेही कुलुप नाही ज्याला किल्ली नाही त्याच प्रमाणे तुम्ही कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी एखादी (तुमच्याही पेक्षा) हुशार व्यक्ती ते शोधून काढू शकते.

१. विंडोज मध्ये पुरावे कसे मिटवाल?

:- १) तुम्हाला जर तुमची एखादी अति महत्वाची फाईल नष्ट ( डिलिट ) करायची असल्यास तीचे नाव बदलून ( तेही कॉम्प्युटरमधल्या एखाद्या फाईलीचे नाव वाटेल असे. ) उदा. ' Setup किंवा Winhelp ' असे देवून त्या फाईलीला डिलिट करा. तसेच ती फाईल रिसायकल बिन मधून देखिल डिलिट करायला विसरु नका.

:- २) तुम्ही केलेल्या किंवा उघडलेल्या फाईलीचे नाव विंडोजमधिल ' Start >> Documents ' मध्ये जमा होते. त्यासाठी ' Start >> Documents ' वर माऊस न्या बाजूला येणार्‍या यादीमध्ये आपण उघडलेल्या फाईलीचे नाव दिसेल, त्यावर माऊसने राईट क्लिक करुन ' Delete ' ह्या बटणावर क्लिक करा.

२. एखाद्या सॉफ्टवेअर मधिल पुरावे कसे मिटवाल?

:- १) एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये उदा. वर्ड, एक्सेल, फोटोशॉप अथवा ड्रिमव्हिवर मध्ये जर तुम्ही एखादी फाईल उघडलीत तर त्याच सॉफ्टवेअरमध्ये बटणांच्या वरील मेनूबारमधिल ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये शेवटी उघडलेल्या काही फाईलींची नोंद दिसेल, त्यात तुम्ही उघडलेल्या फाईलींची देखिल नोंद असेल, इथे फक्त आपल्याच फाईलींची नोंद मिटविणे शक्य नाही त्यासाठी त्या ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली दिसणार्‍या त्या सर्व फाईल्स पून्हा त्याच क्रमाने उघडाव्यात परंतू शेवटी आपली फाईल उघडण्या एवजी दुसरीच एखादी नको असलेली फाईल उघडावी, जेणे करुन आपल्या फाईलींची नोंद तेथून नाहीशी व्हावी आणि त्याएवजी त्या शेवटी उघडलेल्या फाईल येईल.

३. इंटरनेट एक्सप्लोरर मधिल पुरावे कसे मिटवाल?

आपणास माहीत आहेच की इंटरनेट एक्सप्लोरर हे एखादी वेबसाईट पाहाण्यासाठी वापरले जाते, जसे आपण आता त्याच सॉफ्टवेअरमध्ये ( ब्राऊझरमध्ये ) ही सहजच.कॉम वेबसाईट पाहत आहात. इंटरनेट एक्सप्लोररच नव्हे तर कुठल्याही ब्राऊझरमध्ये पाहिलेली कुठलीही वेबसाईट त्याचा ' History ' आणि ' Address Bar ' मध्ये साठविली जाते.

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आपण पाहिलेल्या वेबसाईट नोंद मिटविण्यासाठी खालिल क्रिया करा.

बटणांच्या वरील मेनूबार मधिल ' Tools ' या विभागातील ' Internet Options... ' या उपविभागावर क्लिक करा.


आता समोर येणार्‍या चौकोनात ' Delete Cookies... ' ह्या बटणावर क्लिक करा, त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट/फाईलींची नोंद कॉम्प्युटर ' Temporary Internet Files folder ' नावाच्या एका फोल्डर मध्ये ठेवतो त्यालाच ' Cookies ' असे म्हणतात, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.



आता परत त्याच चौकोनातील ' Delete Files... ' वर क्लिक करा. त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' Delete all offline content ' पुढील चौकोनावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट वरील जास्त वेळ पाहीलेली चित्रे कॉम्प्युटर एका लपविलेल्या ' Temp ' या फोल्डरमध्ये साठवितो, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.


आता परत त्याच चौकोनातील ' Clear History ' या बटणाच्या बाजूला ' 20 ' असे लिहिलेले आढळेल, याचा अर्थ कॉम्प्युटर मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद त्याच्या ' Address Bar ' मध्ये साठवितो. तिथे त्या ' Clear History ' ह्या बटणावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा. परंतू यामूळे ' Address Bar ' मधिल सर्व वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होईल, असे केल्याने कॉम्प्युटर काहिही नुकसान होत नाही फक्त वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होते.




टिप : इंटरनेट एक्सप्लोररमध्ये मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद इथे असते, जर आपण ते बदलून १ दिवस केल्यास प्रत्येक दिवसानंतर त्या दिवशी पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद आपोआप नाहिशी होईल.


वर सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट लक्ष्यात असू द्या तुम्ही पुरावा कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या पेक्ष्या हुशार माणूस तुम्हाला शोधू शकतो.

निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट

१. www.statusdetect.com - या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य' असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता.

२. www.yahoo.com - या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्‍याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर yahoo.com अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा.

३. www.easycalculation.com - या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता.

४. www.transferbigfiles.com - या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता.

५. www.downforeveryoneorjustme.com - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता.

६. www.dontclick.it - इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे.

७. www.pimpmysearch.com - या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल.

८. www.cooltoad.com - जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो.

९. www.meebo.com - याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते.

१०. www.howstuffworks.com - सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे.

११. www.ehow.com - एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे.

१२. www.bugmenot.com - बर्‍याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते.

१३. www.computerpranks.com - कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा.